मी ओंकार घाडी औरंगाबाद ( महाराष्ट्र) मुळात मी कोकण ( कणकवली ) या गावाचा आहे सध्या
औरंगाबाद ( संभाजीनगर) येथे राहत आहे .
तुम्हाला मुंबईतील सर्वच सलाहकारी संस्था (consultancy) बद्दल माहीती असेलच.
मला Shine.com कडून दिनांक २८ मार्च२०१४ रोजी इलेक्ट्रोनिक मैल (E-mail) आलेला होता मी त्या वेब साईट वर विश्वास ठेवून खूप मोठी चुकी केलेलीआहे. ती चुकी माझ्या
गरीब भावांनी करून नये म्हणून मी हि गोष्ट तांच्या पर्यंत पोचवत आहे .
Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर पूर्व या ठिकाणी यांचे कार्यालय आहे. Interview च्या वेळी खूप काही मोठेसंधी तुम्हाला आम्ही देतो असे सांगून गरीब मुलांकडून खूप पैसा काढून घेताय हे लोक ज्या लोकांनी माज्या आधी यांना भेट दिली आहे काम भेटण्यासाठी यांच्याबद्दल संकेत स्थळावर वेब साईट वर या कंपनी बद्दल खरे विचार मांडलेले आहे .
मी जेव्हा येथे दिनांक ०४ एप्रिल २०१४ मुलाखत (Interview) द्याला गेलो तेव्हा मी आणि माझे वडील त्यांचे कार्यालय पाहून खूप खुश झालेलो होतो मी मनातल्या मनात मन्हलो कि आता आपण मोठ्या कंपनीत कामाला लाग्लावर आयुष्य बदलेल.
कार्या लयात गेल्यानंतर माझ्या वडिलांना बाहेर थांबण्यास सांगितले.
कार्यालयात गेल्या नंतर मला २०० रुपये चा फॉर्म भरायला सांगितला व त्या सोबत एक फाईल दिलेली होती त्या फाईल मध्ये आपले सगळे कागद पत्रे जोड्याला सांगण्यात आले व त्याच वेळी मला स्वताचे पारपत्र आहे का विचारले तेव्हा मी नाही म्हणून सांगितले तरीही त्यांनी मला काम भेटेल म्हणून सांगितले. मी त्यांनी सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरला व कागदपत्रे फाईल मध्ये जोडले त्या नंतर मला पहिल्या मजल्यावर पाठविण्यात आले.
त्यावेळी प्रिया नावाची माडम यांनी माझी मुलाखत घेतली.
माझी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी माझे शिक्षण काय झाले म्हणून विचारले तेव्हा मी माझे प्रमाणपत्र दाखविले ते प्रमाणपत्र बघून मन्हाली कि तुमची निवड संगणक क्षेत्रात ( Computer Hardware – Networking) करण्यात आली आहे त्यावर त्यांनी काही प्रश्न पण विचारले मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिले
त्यानंतर मला कामाचा अनुभव सुधा विचारण्यात आला होता तेव्हा मी स्पष्ट पने सांगितले कि मला कोणत्याही कामाचे अनुभव नाही
त्यानंतर तिने मला ४०००० रुपये प्रती महिना पगार देऊ म्हणून सांगितले. मीत्यावेळी विचार केला कि आपल्याला ४०००० रुपये प्रती महिना पगार कोणती कंपनी देणार. म्हणून मी आनंदाच्या भरात या कंपनी मध्ये काम करण्याचे ठरिवले पण जेव्हा मी ४ एप्रिल२०१४ ला (Interview) पास झालो तेव्हा प्रिया माडम ने मला मेडीकल (चेक – उप) तपासणी करून घायला लावली. मेडीकल तपासणी हे गरजेचे आहे असे तिने मला सांगितले त्याच्या शिवाय कामावर लागणार नाही ( joining).
त्या वेळी तिने मला कॅश कॉनटरवर पाठविले व तिथे २०० रुपये भरायला सांगितले त्यानंतर मेडीकल चेक उप चा फॉर्म दिला तो कि मेडीकल इस्पत्लातून मोफत त्यांना दिलेला होता तरीही त्यांनी माझ्या कडून २०० रुपये घेतले . त्या नंतर मी मेडीकल चेक उप साठी मला वाशी येथील आशीर्वाद दिग्नोस्तिक सेंटर येथे जाण्यास सांगितले मी तेथे गेल्यानंतर त्या मेडीकल वाल्याणी माझ्याकडून ४९५० रुपये घेतले त्या नंतर त्यांनी माझे मेडीकल चेकउप केले .
त्याच्या दुसऱ्या दिवशी ०५ एप्रिल २०१४ रोजी माझी आजी वारली
त्यानंतर Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर वाल्याणी ०७ एप्रिल २०१४ रोजी फोन केला कि तुमचे मेडीकल report आले आहे. तुम्हाला आता लगेच च २६०६८/- रुपये (CDC) साठी भरावे लागतील नाहीतर तुम्हाला काम (Job) मिलणार नाही. आणि त्याच वेळे माझी आजी वारली होती हे कारण मी सांगितले असतानाही त्यांना काहीच दु : ख वाटले नाही. ते म्हंटले कि आम्हाला ताच्याशी काही हि घेणे देणे नाही
तुम्हाला लगेच पैसे भरावे लागतील नाही तर आम्ही तुम्हाला काम देऊ शकणार नाही आम्ही तुमच्या साठी थांबू शकत नाही असेही ते म्हटले. तरी हि माझ्या वडिलांनी मला पैसे भरायला दिले माझे वडील म्हणाले कि तुझ्या कामाचे चांगले होत असे तर मी तुला दुसरी कडून पैसे घेऊन देतो पण आधी तुझ्या कामाचे बघ. आणि ते पैसे भरण्यासाठी माझ्या आईने स्वताचे दागिने विकून पैसे दिले त्यानंतर मी दिनांक ११ एप्रिल २०१४ रोजी स्वत तिथे जाऊन २६०६८/- रुपये त्यांना दिले २६०६८/- रुपये भरल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि तुम्हाला ९० ते १०० दिवसांच्या आत कामा वर बोलावले जाईल मी पैसे भरल्या नंतर मला त्यांनी मला पावती दिली त्या पावती वर त्यांच्या पावती वर अपूर्ण कंपनी नमबर होता Original Company Registration No :U74900MH2011PTC225509 and on Slip U74900MH2011PTC22
CDC (Continuous Discharge Certificate) काढ्याचा असेल तर आपल्याला पारपत्र असणे आवश्यक आहे त्या शिवाय आपल्याला CDC भेटत नाही . तर हे कोणत्या प्रकारचे CDC काढून देत आहे ते मलाच माहित नाही
मी मध्ये २६०६८/- रुपये भरल्या नंतर पारपत्र काढले ते माझ्या घर पोच आले तरीही याचे CDC आलेले नाही
आता मी तांच्या मनः नुसार १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर फोन केला तर असे सांगितले कि शनिवार आणि रविवार व सरकारी राजा ह्या ९० -१०० दिवसान मध्येमोजले जात नाही.
मुलाखतीच्या वेळेस तर त्यांनी शनिवार आणि रविवार व सरकारी राजा ह्या ९० -१०० दिवसान मध्येमोजले जात नाही असा उल्लेख सुधा केलेला नव्हता मग फोन केलावर असा उल्लेख कसा करतात.
आता सतत मी फोन केला तर ते फोन पण उचलत नाही आणि जेव्हा पण फोन लावतो तेव्हा नेहमी यव्स्त लागतो आणि उचलला तर अक्षरश मोठ्या आवाजाने सुद्धा बोलतात कि आम्ही तुम्हाला स्वताहून फोन करतो आणि फोन लगेच बंद करतात. मला अजून पर्यंत त्यांनी स्वत हून फोन केलेला नाही आणि फोन केला तर सांगतात आता नाही पुढच्या महिन्यात तुम्हाला आमच्या कडून फोन येईल अजून तुमचे ९० ते १०० दिवस पूर्ण झालेले नाही. असे त्यांचे दर वेळेस फोन केलावर उत्तर तयार असते.
मी त्यांच्या कार्यालात भेटण्यासाठी ०९ जून २०१४ रोजी गेलो तर मला भेटायला सुधा दिले नाही असे भेटता येत नाही म्हणून सांगितले मी तसाच निराश होऊन पुन्हा घरी आलो तेव्हा वडिलांनी मला विचारले कि काय झाले म्हूनण तर मी वडिलान सोबत खोत बोललो कि अजून २ ते ३ महिने लागतील म्हूनण..
त्यानंतर मी २७ जून २०१४ रोजी फोन केला तर जयेश पवार नावाच्या सरांनी फोन उचलला तेव्हा त्यांनी मला सांगितले कि २० ऑगस्ट २०१४ रोजी तुम्हाला बोलावले जाईल जयेश सरांनीसांगितल्या प्रमाणे
मी आज २० ऑगस्ट २०१४ रोजी पण फोन केला तर असे सांगण्यात आले कि २५ ते ३० च्या दरम्यान कळविण्यात येईल. आता अजून हे असे किती दिवस पुढे ढकलत बसणार ते देवालाच माहिती.
एक तर आम्ही खूपच गरीब आहोत मी माझ्या आईचे दागिने सुधा विकले मी सध्या खूप परेशान आहे मला भीती वाटत आहे कि माझे भर लेले पैसे तर डूबले तर नाही ना.
मी माझ्या घरांच्या च्या नजरेत नजर मिळवू शकत नाही मला जो पर्यंत काम मिळत नाही तो पर्यंत मला जगणे मुशकिल झाले आहे .
मी २५ ऑगस्ट ला फोन केला होता तेव्हा मला प्राची माडम ने सांगितले कि २८ ते ३० ऑगस्ट च्या दरम्यान यादी येईल त्यानंतर मी त्यांनी सांगितल्या प्रमाणे पुन्हा २८ ला फोन केला तर तेव्हा पण अजून पुढची तारिख संगीतली. २८ तारखेला माझी आई त्या प्राची माडम सोबत बोलली तेव्हा प्राची माडम माझ्या आईला मान्हाली कि आम्ही तुम्हाला यादी आल्यावर फोन करू तुम्ही फोन करून परेशान करू नका.
माझी आई तेव्हा प्राची माडमला मान्हाली कि आम्हाला आता तुमच्या कामाची गरज नाही आता आम्हाला आमचे भरलेले पैसे वापस पाहिजे ते वापस करून द्या तेव्हा प्राची माडम माझ्या आईला मान्हाली कि तूम्ही १ ते १० तारखेच्या आत काम नाकारण्याचा फॉर्म भरून द्या त्या नंतर अजून १ महिनानी तुम्हाला तुमचे भरलेले सगळे पैसे वापस देऊ त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागेल.
मी जेव्हा १ सप्टेंबर ला तेथे गेले तर तिथे बाहेर दिपक नावाचा सर बसवून ठेवलेला आहे तो फक्त पोरना धमकाव्ण्याचे काम करतो तेव्हा त्या दिपक ने मला प्राची माडमला भेटायला सुद्धा दिले नाही. मी तेव्हा माझ्या वडिलान सोबत गेलो होतो तेव्हा वडिलांना बाहेर थांब्याला सांगितले मी त्या दिपक ला मान्हालो कि आस कोणता नियम आहे कि कार्यालयात वडिलांना घेऊन येऊ शकत नाही . मोठ्या मोठ्या कार्या लयात आई वडिलांना येऊ देऊ शकतात तर तुमच्या कार्या लयात का येऊ देऊ शकत नाही तर तेव्हा तो दिपक मान्हाला कि आमच्या येथे असे चालत नाही .वडिलांना सोबत घेऊन गेलो मन्हून तो माझ्या सोबत भांडण करू लागला.तेव्हा मी त्या दिपक ला मान्हालो कि मला आता तुमच्या कामाची गरज नाही मला माझे भरलेले पैसे वापस पाहिजे तर त्याने मला पैसे भरलेल्याची पावती मागितली तेव्हा मी त्याला पैसे भरले ल्याची पावती दाखवली तेव्हा तो मान्हाला कि तुम्हाला आता काम नाकारता येणार नाही मी त्याला मान्हालो कि मला तुमच्या कामाची गरजच नाही तर मी का नाकारू नको तर तेव्हा तो दिपक मान्ह्ला कि तुमच्या पैसे भरले ल्या पावतीची वैधता संपलेली नाही त्यामुळे आम्ही आता तुम्हाला तुमचे पैसे वापस करू शकत नाही हे सगळे बोलणे माझ्या वडिलान समोर जाले तेव्हा माझ्या वडिलांकडे बघून तो पुन्हा मान्हाला कि त्यांना बाहेर पाठवून द्या मी त्या दिपक ला मान्हालो कि आम्ही खूप दूरचा प्रवास करून आलेलो आहे मी त्यांना बाहेर थांबू देणार नाही तर तेव्हा तो दिपक मध्ये गेला आणि दुसर्या एका माणसाला पाठवले माझ्या जवळ आणि मान्हाला कि सरांनी तुम्हाला मध्ये बोलावले आहे तेव्हा मी आणि माझे वडील जेव्हा तांच्या जवळ जाणार तेव्हा त्याने पाठविलेल्या माणसाने माझ्या वडिलांना मध्ये येऊ दिले नाही असे तुम्हाला मध्ये जाता येणार नाही मन्हून त्यांना तेथेच बसवून ठेवले.
तेव्हा तो दिपक मला मध्ये घेऊन गेला त्याला मी मान्हालो कि मला आता तुमच्या कामाची गरज नाही मला माझे भरलेले पैसे वापस पाहिजे तेव्हा तो मान्हाला कि अजून पैसे भरल्यावर ९० ते १०० दिवस पूर्ण जालेले नाही तर तुला काम कसे काय मिळेल ९० ते १०० दिवस पूर्ण झालावरच काम मिळेल ना त्यानंतर मी त्या दिपक ला मान्हालो कि प्राची माडम सोबत माझे बोलणे झालेले होते तेव्हा प्राची माडम मला आणि माझ्या आईला मान्हाली कि १ ते १० तारकेच्या आत कार्या लयात येउन फॉर्म भरून द्या त्यानंतर १ महिनानी तुम्हला भरलेले पैसे वापस भेटील
तेव्हा तो दिपक मला सांगत होता कि अजून ५ / ६ दिवसांनी यादी येणार आहे तेव्हा तुझे नाव असेल त्या यादीत आता नाकारून काहीही फायदा नाही . मी मान्हालो कि मला मुळीच तुमच्या कामाची गरज नाही मला माझ्या मायभूमीत चांगले काम भेटले ले आहे तर कशाला मी तुमच्या कडे काम करू तेव्हा तो मला मान्हाला कि तुमचे प्रोसेस चालू आहे तुम्हाला आतच काम मिळेल तेव्हा तो दिपक मान्हाला कि तुला जेथे काम भेटले आहे तिथेल joining letter आणून दे तेव्हा मी तुझा काम नाकारू शकतो अन्यथा मी हे ग्राह्य धरू शकत नाही .मी तेव्हा त्या दिपक ला मान्हालो कि मला खरच मला तुमच्या कामा मध्ये विश्वास नाही तर तेव्हा तो मान्हाला कि तुला आमच्या वर विश्वास नाही का ??
तेव्हा मी मान्हालो कि प्राची माड म तर मान्हाली होती कि ३० ऑगस्ट पर्यंत काम भेटेल मन्हून मंग अजून मला का काम मिळाले नाही तेव्हा त्या दीपक ने प्राची माडम ला फोन केला तेव्हा ती फोन वर माझ्या सोबत बोलली कि तुमची अजून १० दिवस थांबा मन्हून तेव्हा मी मान्हालो कि आधी मी तुम्हाला सांगितले होते कि मला तुमच्या कामाची गरज नाही मन्हून तर त्या वेळी ती प्राची मला मान्हाली कि तू मोठ्या आवाजात बोलू नको आमचे काहीच करू शकत नाही तू .
तेव्हा मी त्या दिपक ला बोललो कि मी माझ्या आईचे दागिने विकून पैसे भरलेले आहेत तर तेव्हा तो दिपक मान्हाला कि तो आमचा प्रोब्लेम नाही तो तुमचा प्रोब्लेम आमची तुम्हाला दागिने विकून पैसे थोडेच भर याला सांगितले होते आणि तू कोणत्याही मोठ्या व्यक्तीला किवा पोलिसांना जरी घेऊन आला तरी आमचे कोणीच काही करू शकत नाही .
तुला एकदा सांगितलेले समजत नाही का असे दिपक मला बोलला तेव्हा मी खूप घाबरलो आता तर समोरच मरण उभे आहे बाहेर माझे वडील उभे आहे काय करावे आणि काय नाही काहीह्च सुचार नव्हते

तेव्हा तो दिपक मला मान्हाला कि तू आता डिसेंबर मध्ये ये १ ते १० तारखेच्या आत तेव्हा तुला तुझे भरलेले पैसे वापस भेटेल आता तू येथे कितीही वेळ थांबला तरीही काही होणार नाही आत तू घरी जा असे तो मला बोलला .एक तर आम्ही श्रीमंत पण नाही मी आणि माझे आई वडील जेव्हा काम करून पैसा घरात आणतो तेव्हा आमचे घर कुठे चालते. खरच मी या Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर मध्ये पैसे भरून चुकी केलेली आहे .
पैसे भरून सुद्धा हे लोक आपल्याला धमकी देतात मान्ह्जे किती खतरनाक गोष्ट आहे. मला माझे भरलेले पैसे वापस पाहिजे आहेत ते पैसे मला वापस भेटले तर मी माझ्या आईचे पहिले दागिने सोडवून आणीन तेव्हा कुठे माझ्या मनाला शांती लाभेल.

आणि आता सुधा त्यांनी पेपर मध्ये जाहिरात दिलेली आहे कि आमच्या येथे all field साठी vacancy आहे. ते फक्त गरीब मुलांना लुबाडण्याची कामे करत आहे
पण मला एक प्रश्न असा पडतो कि Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर या कंपनी ची खूप बदनामी झालेली असून Shine.com TimeJobs.Com Naukari.Com वाले यांना कसे प्रोत्सान देतात
माझी माझ्या महाराष्ट्रातील सर्व गरीब भावांना अशी विनंती आहे कि तुम्ही Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd मध्ये माझ्य्सारखे बळी पडू नका.
मी खूप गरीब आहे माझे आई वडील नेहमी आजारी राहतात घरात फक्त मीच मोठा आहे मला माझे कुटुंब सांभाळावे लागत आहे तरीही माझ्या आई वडिलांनी मला पैसे दिले.
आता जर पुन्हा Seven Seas Airport and Seaport Management India Pvt Ltd यांची जाहिरात पेपर मध्ये आली असेल तर आधी पूर्ण पणे माहिती काढूनच तेथे जावे अशी माझी नम्र विनंती आहे .
आणि मीडिया वाल्याना माझी नम्र विनंती आहे कि हि माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब लोकांन पर्यंत पोचवावी.
माझे महाराष्ट्रातील बांधवांचा विचार करून मी हे बोलत आहे.
आर एस पंदियान हा मालक आहे आणि ते लोक आपल्याकडून पैसे घेऊन त्यांच्या स्वताच्या कामासाठी आपला पैसा वापरतात त्यांच्या जवळ स्वताची कोणत्या प्रकारची जहाज नाही जेणे करून ते आपल्याला काम देतील . आणि त्या कार्यालात बसणारी माणसे सुधा स्वताचे खरे नाव सांगत नाही . मला माझे सगळे पैसे वापस पाहिजेत . तुम्ही भरलेले असतील तर तुम्ही सुधा सुमचे पैसे वापस घेऊन टाका अन्यथा आपल्या आई वडिलांची कमाई चे पैसे ते हरामखोर लोक वापरून घेतील आणि आपले पैसे सुधा वापस देणार नाही. काही तरी करा जेणे करून अश्या हरामखोर लोकांना दादागिरी करताना विचार करावा लागेल.
ते लोक त्याचे स्वताचे खरे नाव का नाही सांगत ? ? ?
सचिन खंडागळे त्याचा मोबाइल न ९१४६१६२६३९ (9146162639)हा त्याचा पेर्सोणाल मोबाइल नंबर आहे जो कि आपल्याला त्याचे नाव दीपक सांगण्यात आलेले आहे. तर मित्रानो कृपया हि गोष्ट सर्व भारत भर पसरावा जेणे करून अजून कोण गरीब मुले फसणार नाहीत.
ओंकार घाडी
९७६२८८४५६०


Post your reviews / feedback or experience by clicking on the following submit complaint button.
Frustrated?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Us